मला माझीच भेट घेऊ दे
आज जरा थोडीशी घेऊ दे
चेहर्यांच्या गर्दीत घुसमटलो
आहे
एकटक क्षितिजापार पाहू
दे
गोंगाट कोलाहलापासून दूर
मनातच एक छानसे गाणे गाऊ
दे
भडक रंगांना खोल खोल बुडवून
स्तब्ध अंधाराचा थांग लावू
दे
मग येईनच मी पुन्हा माणसात
आज जरा थोडीशी घेऊ दे
No comments:
Post a Comment