Monday, May 2, 2011

क्रूरकर्मा संपला

कुख्यात दहशतवादी ओसामा बिन लादेन ठार मारला गेल्याचे वृत्त वाचून मिश्र भावना मनामधे उठल्या. एकीकडे माणुसकीला काळीमा फासणार्‍या नराधमाचा अंत झाला ह्याचा आनंद होत आहे तर दुसरीकडे ह्यामुळे पाकिस्तानला होणार्‍या प्रचंड फायद्याची चिंता लागून राहिली आहे.

ओसामा त्यांच्या भूमीवर मारला गेला याचे भांडवल पाकिस्तानचे सरकार नक्कीच करणार. त्यांची दहशतवादाविरुद्ध असलेली दुतोंडी भूमिका, तालिबानला असलेला अप्रत्यक्ष पाठिंबा, आय एस आय चे दहशतवादी संघटनांबरोबर असलेले छुपे संबंध हे सर्व आता विसरले जाईल. अमेरिकन सरकार पुन्हा त्यांना सढळ हातने अर्थिक आणि सामरीक मदत करेल आणि ती मदत कोणाविरुद्ध वापरली जाईल हे आपल्याला सांगायची काही गरजच नाही.

त्यामुळे सध्या तरी मी जरा धास्तावलेलाच आहे.

No comments:

Post a Comment