आताशा
कळेना हे का असे व्हावे
ऊठसूट
मन आठवणींमागे धावे
निमित्त
व्हावे मग ’दुनियादारी’चे
अन् खोल
आतून कोणी हुंकारत जावे
फोटोमधे
जरी दिसती सारे तेच चेहरे
गेले
कुठे ते हेच कोणा ना कळावे
जीवलग
मैत्रीचे घट्ट बहुपेडी धागे
संवादाविना
का असे उसवत जावे
गोळा
करू जाता जशी निसटते वाळू
हात ’आमोद’चे रिते रितेच उरावे