गझलप्रेमींना एकामागून एक धक्के द्यायचेच नियतीने ठरवले आहे असे वाटते. जगजितजींच्या दुखातून अजून आम्ही पूर्णपणे बाहेर पडतो आहोत तोच एक अजून जबरदस्त वार कलेज्यावर झाला आहे. गझलसम्राट ह्या पदवीला ज्यानी खरी शोभा बहाल केली तो अत्यंत तरल आवाज आम्हाला आज सोडून गेला आहे.
गझलसम्राट मेहदी हसन साहेब म्हणजे गझल गायकीचे मूर्तीमंत उदाहरण. गझलेतल्या प्रत्येक शब्दाचा अर्थ आणि त्यामागचा भाव जसाच्या तसा रसिकांपर्यंत पोहोचवण्याची त्यांची हातोटी इतर कुणाला जमलीच नाही. गझलेच्या दरबारातली एकहून एक सरस रत्ने अशी गळून जात आहेत.
महफिलें अब सूनी हो गयी हैं
आणि आमचे दुर्भाग्य हे की आशेचा एकही किरण नजरेस पडत नाही. नविन गायक गझल हा प्रकार जणू विसरूनच गेले आहेत. बरोबर आहे म्हणा शब्द, अर्थ, भाव असल्या फालतू गोष्टींकडे लक्ष द्यायला वेळ कोणाकडे आहे? संगीताच्या गदारोळापेक्षा ऊंच आवाज चढवता आला म्हणजे झाले.
मेहदी साहेबांच्याच शब्दात सांगायचे तर...
अब के हम बिछडे तो शायद कभी ख्वाबोंमे मिले
जिस तरह सूखे हुए फूल किताबोंमे मिले